कुंडलवाडी— रुपेश साठे दि.२५ : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर कार्यकारणी नुकतीच झाली असुन मनसेच्या शहर उपाध्यक्ष पदी अजय श्रीपती गट्टूवार तर सचिवपदी महेश नागनाथ चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
सदरील निवडीचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मौंटीसिंग जहागीरदार यांच्या हस्ते देण्यात आले असुन याप्रसंगी मनसेचे नांदेड शहराध्यक्ष अब्दुल शफीक,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष दिपक स्वामी,वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सन्नेवाड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गजानन चव्हाण, रवी राठोड,यांच्यासह मनसेचे कुंडलवाडी शहराध्यक्ष साहेबराव लक्ष्मण कोंडावार यांची उपस्थिती होती.