परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज गीता जयंती उत्साहात साजरी.

देगलूर दि.१२ :-  परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या मुर्ती पुजनाने करण्यात आली यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी गीतेचा बारावा व पंधरावा अध्याय मुखोद्गत म्हंटले या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्रभाऊ आलुरकर स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांतसेठ रेखावार उपाध्यक्ष प्रा.गिरीश वझलवार, कार्यवाह प्रकाशभाऊ चिंतावार हे होते.

कार्यक्रमाचे मुख्य वक्त्या सौ. वैशालीताई मिर्झापूरकर यांनी म्हटले की गीता पाच हजार वर्षांपूर्वी श्री. कृष्णाने अर्जुनाला सांगितली जीवनामध्ये विद्या, शांती हवी असेल तर आपल्यात श्रद्धा, स्वतः वर विश्वास हवा जीवनात सातत्य असायला हवे भगवंत प्रत्येकाच्या

 

 

 

हृदयात आहेत असे सांगत जीवनामध्ये आई- वडीलांचे महत्त्व सांगितले. गुरु द्रोणाचार्य यांच्या बद्दलच्या गोष्टी सांगितल्या यानंतर समारोपाच्या भाषणात विद्यालयाचे उपाध्यक्ष प्रा. गिरीश वझलवार यांनी गीता ही पाचवा वेद आहे माणसाने प्रसंगात कसे वागावे काय करावे व काय करु नये यांचे स्मरण आपल्याला गीता करुन देते.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ देखिल गीतेवर आधारित आहे. असे म्हंटले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे व प्राथमिक मुख्याध्यापक दमण देगावकर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सुजित मुगुटकर यांनी केले तर सुत्रसंचलन सौ. राधिका पांचाळ बाई यांनी केले.