नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी
किनवट प्रतिनिधी, दिनांक २६ ऑगस्ट : किनवट शहर राज्यातील व देशातील इतर शहरांच्या तुलनेत मागासलेले असल्याचे एकमेव कारण म्हणजे येथे तरुणांना उद्योगाकडे व शिक्षणाकडे आकर्षित करण्याकरिता कोणीही पुढाकार घेत नाही नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की कोणत्याही प्रकारची राजकीय, व सामाजिक. संस्थेच्या इच्छाशक्तीचा अभाव असल्याने या भागातील युवक भरकटले असून ते वाममार्गाला जात आहेत.
असे असताना त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्यक्रम राबवण्या ऐवजी किनवट शहरात आगामी काळात तीन नवीन बियर बार, व देशी दारूच्या दुकानाची स्थापना होणार असल्याचे कळते आहे.
किनवट शहरातील गोरगरीब जनता व युवकांना व्यसनाधीन करण्याचे काम सध्या तेजीत सुरू असून त्या प्रक्रियेच्या विरोधात किनवटच्या नगरसेविका खुतीजा बाबू तवर, फिरोज तवर, व रिपाई चे विवेक ओंकार यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाकडे निषेध नोंदवला आहे. नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की शहरातील काही संवेदनशील भागात मध्य विक्रीच्या आस्थापनांना स्थापित करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था सुव्यवस्था बाधीत होऊ शकते त्यामुळे सदर दारू विक्री च्या आस्थापनांना परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी सादर केलेल्या निवेदनात केली आहे.
शहरातील शिवाजीनगर भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, शाळा आहेत, रुग्णालय आहेत, नागरी वस्ती आहे, व मागील पंचवीस वर्षापासून गणेश मंडळाची स्थापना ज्या िकाणी केले जाते त्या ठिकाणी दारू विक्रीचे दुकान सुरू करण्याची प्रक्रिया चालू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात शिवाजी नगर, गोकुंदा रोड, रेल्वे स्टेशन. भागात नवीन दारू विक्रीचे दुकान स्थापित होणार असल्याचे एकूण प्रक्रिया होत असल्याने या भागातील नागरिक हे विरोध नोंदवत आहेत.