नांदेड दि.०६ :- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगाराची शिवजयंती मंडळाची कार्यकारिणी निवडीची बैठक दि.४ फेब्रुवारी २०२५ मंगळवार रोजी सायंकाळी ठिक ५.०० वाजता आगार व्यवस्थापक नांदेड यांच्या दालनात विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांत वडस्कर यांच्या
अध्यक्षतेखाली व विभागीय कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे, बसस्थानक प्रमुख यासीन हमीन खाद, आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात येवून खालीलप्रमाणे शिवजयंती मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली.
अध्यक्षपदी शरद नायक तर सचिव म्हणून चंद्रकांत कदम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. कोषाध्यक्ष सुर्यकांत चापोले, सदस्यपदी गुणवंत एच.मिसलवाड, राजेश कांबळे, बालाजी शिंदे, जय कांबळे, राजेश पुयड, विजय कदम, संभाजी सुर्यवंशी, दौलत पाटील, स.दिलबागसिंघ गडगंज, संदीप जेठी, माधव केंद्रे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार जय कांबळे यांनी मानले. यावेळी रा.प.म. आगारातील कामगार-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.