निकिता किरजवळेकर यांना एल.एल.एम.मध्ये प्रथम क्रमांकाने यश.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, संभाजीनगरची मान उंचावली

देगलूर प्रतिनिधी,दि.०३ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर येथून एल.एल.एम. (विधी न्यायिक) पदवी A+ ग्रेडसह प्रथम क्रमांकाने

 

यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल निकिता संजय महाराज किरजवळेकर यांनी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्पा गाठला आहे.

 

 

निकिता किरजवळेकर यांचे हे यश त्यांच्या कठोर परिश्रम, चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीचे प्रतीक आहे. त्यांनी विद्यापीठात आपले विशेष स्थान निर्माण करत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.

 

 

 

या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

निकिता यांच्या या उल्लेखनीय कामगिरीने संपूर्ण परिसरात गौरवाची भावना निर्माण झाली असून, भविष्यात त्या न्याय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

साप्ताहिक महिमा खादीचा च्या संपूर्ण परिवारातर्फे तिचे खूप खूप अभिनंदन.