नांदेड प्रतिनिधी,दि.०८:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नांदेड आगारातील कार्यरत वाहतूक नियंत्रक बालाजी शिंदे यांची एसटी को-ऑप. बँक लि., नांदेड शाखेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय श्रमण सेनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता एसटी मध्यवर्ती बसस्थानक प्रमुख यांच्या दालनात हा कार्यक्रम पार पडला. राज्याध्यक्ष तथा कामगार नेते ॲड. विष्णू गोडबोले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
एसटी को-ऑप. बँक नांदेड शाखेची स्थापना १९५४ मध्ये झाली असून सध्या २७ हजार सभासद व ४५०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. बँकेच्या महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत ५० शाखा कार्यरत आहेत.
या प्रसंगी ॲड. गोडबोले म्हणाले, “बालाजी शिंदे यांचे कष्टकरी कामगारांशी जिव्हाळ्याचे नाते आहे. ते बँकेच्या सभासद व ठेवीदारांच्या हितासाठी सकारात्मक कार्य करतील.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. प्रमुख उपस्थितीत बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, संचालक बालाजी शिंदे, मयूर तेलंगे, गुलाम रब्बानी, दत्तात्रय जोशी आदींचा समावेश होता. कार्यक्रमास रापम आगारातील कष्टकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.