एसटी मेकॅनिक ते समाज भूषण – गुणवंत मिसलवाडांचा सन्मान

 

नांदेड दि.१० ऑगस्ट:-  जागतिक आदिवासी दिनानिमित्त नांदेड येथील हॉटेल राजयोग पॅलेस येथे आदिवासी कोळी महादेव समाजाच्यावतीने आयोजित सन्मान सोहळ्यात एसटी मेकॅनिक तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांना “आदिवासी कोळी महादेव समाज भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

या कार्यक्रमात जिल्ह्यातील ७० गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी, २० नवनियुक्त कर्मचारी आणि ५ समाजभूषण पुरस्कारार्थी अशा एकूण ९५ जणांचा सत्कार करण्यात आला. मिसलवाड यांनी एसटी महामंडळातील सेवेसोबतच समाजकार्यातही लक्षणीय योगदान दिले असल्याने त्यांचा हा सन्मान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

 

 

ज्येष्ठ नेते मा. यादवराव तुडमे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मिसलवाड यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नागनाथराव घिसेवाड, चंद्रकांत गुंगेवाड, रमेश पिठ्ठलवाड, शशिकांत भुसेवाड, आनंदा रेजीतवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादाराव कोठेवाड यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर मरकंठे यांनी केले तर आभार माधव रेड्डेवाड यांनी मानले.