नांदेड, १० ऑगस्ट :- देशभरात भाऊ -बहिणींच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा उत्सव असलेला रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये रेशमी, डिझायनर व पर्यावरणपूरक राख्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी उसळली होती. मिठाईचे दुकाने, गिफ्ट शॉप्स आणि फुलबाजारातही खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला.
भावाच्या उजव्या हाताला राखी बांधून बहिणीने त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची कामना केली, तर भावाने बहिणीचे रक्षण करण्याची शपथ घेऊन तिला भेटवस्तू दिली. काही ठिकाणी कुटुंबीयांनी एकत्र येऊन पारंपरिक जेवणाचा आस्वाद घेत उत्सव साजरा केला.
शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक संस्थांनीही रक्षाबंधनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले. लहान मुलांनी, जवानांनी, तसेच समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांना राखी बांधून बंधुभावाचा संदेश दिला.
रक्षाबंधन हा फक्त एक सण नसून परस्पर स्नेह, जिव्हाळा आणि रक्षणाच्या वचनाचा प्रतीक आहे, असे भाविकांनी सांगितले.