राजमोहन चौकात दहीहंडीला परवानगी नको – नागरिकांची मागणी

जुनी जीर्ण इमारती, रुग्णालये व क्लिनिक असलेल्या परिसरात स्पीकरचा दणदणाट; ढासळण्याचा धोका व त्रासावरून नागरिकांचा आवाज

पूणे/खडकी, दि. १२:- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील राजमोहन चौकामध्ये दरवर्षी गोपाळकाला निमित्त मोठ्या उत्साहात दहीहंडीचे आयोजन केले जाते.

 

 

मात्र, या परिसरातील जीर्ण इमारती, क्लिनिक, मेडिकल स्टोअर्स व घनदाट लोकवस्तीमुळे येथे कार्यक्रमास परवानगी देऊ नये, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

 

राजमोहन चौक (गोपी चौक) परिसरात दोन क्लिनिकसह अनेक मेडिकल स्टोअर्स आहेत. परिसरातील काही इमारती जुनी व जीर्ण झाल्याने ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे. दहीहंडी निमित्त लावल्या जाणाऱ्या प्रचंड आवाजाच्या

 

 

स्पीकर भिंतीमुळे हा धोका अधिक वाढतो. दिवसभर साउंड टेस्टिंगच्या नावाखाली सुरू राहणाऱ्या दणदणाटामुळे नवजात शिशू, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

 

 

नागरिकांचे म्हणणे आहे की, या ठिकाणी होणारी प्रचंड गर्दी व ध्वनीप्रदूषण यामुळे आरोग्य आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे बोर्ड प्रशासन व पोलीस प्रशासनाने

 

 

यावर्षी राजमोहन चौकात दहीहंडी आयोजनासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये, असा आग्रह नागरिकांनी धरला आहे.