देगलूरमध्ये अमृत महोत्सवानिमित्त भव्य तिरंगा रॅली

 

देगलूरमध्ये अमृत महोत्सवानिमित्त भव्य तिरंगा रॅली

 

देगलूर, दि. 13 ऑगस्ट – 79 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव निमित्त देगलूर नगरपालिकेतर्फे आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत शहरातील पाच प्रमुख शाळांमधील एकूण 1000 विद्यार्थी सहभागी झाले.

 

या रॅलीत सहभागी शाळा पुढीलप्रमाणे होत्या —

1️⃣ मानव्य विकास विद्यालय

2️⃣ सावित्रीबाई फुले विद्यालय

3️⃣ गोळवणकर गुरुजी विद्यालय

4️⃣ साधना हायस्कूल

5️⃣ मौलाना अब्दुल कलाम उर्दू स्कूल

 

तिरंगा रॅलीची सुरुवात नगरपालिका देगलूर येथून झाली. रॅलीने शहरातील मुख्य रस्ता व बाजारपेठ मार्गे उत्साहात व शांततेत प्रस्थान केले. कार्यक्रमादरम्यान योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच सतत पेट्रोलिंग करण्यात आले. सध्या शहरात संपूर्ण शांतता आहे.