राजस्थानमधील दौसा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले.

नवी दिल्‍ली, १४ ऑगस्‍ट :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील दौसा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली.

 

 

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमांवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :

“राजस्थानमधील दौसा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले. आपल्या जिवलगांना गमावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना मी करतो.

 

 

प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये दिले जातील. तसेच जखमींना ५०,००० रुपये दिले जातील.