नांदेडमध्ये अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाईनचा शुभारंभ – पालकमंत्री अतुल सावे

 

नांदेड प्रतिनिधी, दि.१६:- नांदेड परिक्षेत्रातील गुन्हेगारी व अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ‘खबर’ ही विशेष हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.

 

 

१५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वतंत्र्यदिनानिमित्त नांदेड परिक्षेत्रातील पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री मा.ना. श्री. अतुल सावे यांच्या हस्ते या

 

हेल्पलाईनचे उद्घाटन झाले. नागरिकांना 91 50 100 100 या क्रमांकावर फोन करून अवैध व्यवसाय, जुगार, मटका, गुटखा, महादेव अॅप, बेकायदेशीर धंदे यांची माहिती गुप्तपणे देता येईल.

 

 

गेल्या चार वर्षांत नांदेड परिक्षेत्रात विविध अवैध व्यवसायांविरोधात 468 हून अधिक गुन्हे दाखल होऊन १.९७ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नागरिकांच्या सहकार्याने ही लढाई अधिक प्रभावी होईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 

 

पोलिस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी नागरिकांना आवाहन केले की, आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांविषयी माहिती तत्काळ ‘खबर’ हेल्पलाईनवर द्यावी.