देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे विविध सामाजिक उपक्रमांसह ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा.

 

देगलूर प्रतिनिधी, दि.१६:- उपजिल्हा रुग्णालय, देगलूर येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांच्या हस्ते पार पडले. या वेळी सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

 

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त हार अर्पण, दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. कै. रघुनाथ शेट्ये (माजी प्राचार्य, देगलूर कॉलेज) यांच्या

 

स्मृतिप्रित्यर्थ शेट्ये परिवाराने नवसंजीवनी गार्डनसाठी दोन सिमेंट बेंच भेट दिल्या. डॉ. देवणीकर मित्रपरिवाराने गार्डनमधील १०१ झाडांसाठी ठिबक सिंचन यंत्रणा दिली.

 

 

कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरच्या सीटी स्कॅन विभागाने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सिस्टर्सना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच वैद्यकीय अधीक्षक यांचे बालमित्र यांनी गरीब गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या औषधांसाठी अकरा हजार रुपये मदत निधी दिला.

 

 

कार्यक्रमात डॉ. अनिल थडके यांचा वाढदिवस साजरा करून वृक्षारोपण करण्यात आले. अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांसह ७९ वा स्वातंत्र्य दिन रुग्णालय परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.