उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘रानभाजी महोत्सवा’चे उद्घाटन

बीड, दि.16 : येथील सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात कृषी विभागाने पावसाळ्यातील रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले असून, आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. यावेळी त्यांनी रानभाजी स्टॉलची पाहणी करुन रानभाज्यांची माहिती घेतली.

यावेळी आमदार सर्वश्री संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, यांच्यासह सर्व कार्यालयप्रमुख, अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉलला भेट देवून रानभाज्यांची माहिती घेतली. या प्रदर्शनात विविध रानभाज्यांचे प्रदर्शन लावण्यात आले व विक्रीसाठीही रानभाज्या उपलब्ध होत्या. सुरण, टाकळा, पाथरी, भुईआवळी,

 

 

कपाळफोडी, तरोटा, उंबर, चिगुर, सराटे, घोळ भाजी, केना, शेवगा, कर्टुली इ. रानभाज्यांपासून बनवलेल्या विविध पदार्थांचेही प्रदर्शन, तयार करण्याची पाककृतीही सादर करण्यात आली. या महोत्सवात शेतकरी महिला, बचतगट, शेतकरी गट त्याचप्रमाणे शेतकरीही सहभागी झाले होते.