“संततधार पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहावे” – पोलीस निरीक्षक मारोती मुंडे.

 

देगलूर पोलीस स्टेशन कडून आवाहन

देगलूर प्रतिनिधी, दि.१६ ऑगस्ट:- पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हद्दीतील संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटलेला आहे.

 

 

वझरगा – तूपशेळगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क खंडित झाला आहे.

नांदेड–देगलूर रोड – लखा गाव पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

 

कुरुडगी – नरंगल रोड वरील सिमेंट काँक्रीट पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेला.

शहापूर – रामपूर मार्गावरील नाल्यावरून जाताना एक टिपर पलटी झाला, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

 

 

तहसीलदार, नगरपालिका, ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत कळविण्यात आले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे. पोलीस पेट्रोलिंग सुरू असून हद्दीत शांतता आहे.

 

नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.