दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत संगीत रजनी व महाप्रसादाचा भव्य सोहळा.

नांदेड प्रतिनिधी दि.०५ :- सतत २९ व्या वर्षी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने भव्य संगीत रजनी व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण, भाजप महानगराध्यक्ष अमर राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

शुक्रवारी श्रीराम सेतु गोवर्धन घाट पुलाजवळ डॉ. संतोष यादव यांच्या क्लिनिक समोर उभारलेल्या भव्य व्यासपीठावर दुपारी चार वाजता महाप्रसादाची सुरुवात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारतीय, मुन्नासिंह तेहराधर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते झाली. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व भक्तांना स्वादिष्ट मसाला चण्याचा महाप्रसाद रात्री साडेअकरा वाजेपर्यंत वाटप करण्यात आला.

 

 

 

या प्रसंगी दुर्गादेवी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार श्रीजया चव्हाण, भाजप महानगराध्यक्ष अमर राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, युवा नेते आशुतोष राजूरकर आदींचा समावेश होता. सुरेश लोट यांनी आमदार श्रीजया चव्हाण यांचा शाल, फेटा, पुष्पहार व साईबाबाची आकर्षक संगमरवरी मूर्ती देऊन सत्कार केला.

 

 

 

कार्यक्रमास डॉ. सचिन उमरेकर, भाजपा सरचिटणीस विजय येवणकर, शितल खांडील, सुषमा थोरात, नागनाथ गड्डम, श्रीकांत बाहेती, बागड्या यादव, अभिषेक सौदे, प्राचार्य शिवनीकर, गुरुदीपसिंघ संधू, संतोष परळीकर, रूपेंद्रसिंग साहू, ओमप्रकाश तापडिया, सुरेश पळशीकर, कैलास महाराज वैष्णव, गोपाळराव मळगे, दीपकसिंह ठाकूर, गिरीश भंडारी, चंचलसिंह जट आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

भाजप पदाधिकारी अर्चना शर्माप्रगती नीलपत्रेवार यांनी महिलांची ओटी भरली. दरम्यान रागिनी जोशी यांच्या संगीत संचाने एकापेक्षा एक सरस भक्तिगीते सादर केली. त्यांच्या गीतांवर महिलांनी मनसोक्त नृत्य करून उत्सवाचा आनंद लुटला. उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या महिला व मुलींना सुरेश लोट यांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

 

 

 

कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचलन अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवा लोट यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा लोट, सुरेश शर्मा, अरुण काबरा, शिवचरण लोट, सुनील रामदासी, नरेश लोट, कैलास कुंटूरकर, महादू शिंदे डेरला सरपंच, रोहित लोट, रामजी भोकरे, शुभम पवार, सौरभ मचलू यांनी परिश्रम घेतले.