देगलूर दि.१२ :- आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मुली सक्षमपणे उभ्या आहेत. समानतेचे सूत्र समाजातील प्रत्येकाने स्वीकारायला हवे त्यांच्या पंखाला बळ मिळण्यासाठी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मुलींना समतोल आहाराची गरज आहे असे मत प्रा. मंजुषा आलुरे यांनी व्यक्त केले त्या येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालच्या
कनिष्ठ विभागात बालिका दिनाच्या औचित्याने सखी सावित्री समितीच्या उपक्रमांतर्गत इयत्ता अकरावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना समतोल आहार याविषयी समुपदेशनात बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.व्हि.जी.शेरीकर होते प्रारंभी या उपक्रमाविषयीची माहिती प्रास्ताविकातून प्रा.सौ.वद्देवार शोभा यांनी दिली .
इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यीनीनी समतोल आहार कसा करावा या वयोगटात असणाऱ्या विद्यार्थ्यांचे[ हार्मोन्स ]संप्रेरकात होणारे सतत बदल ,तसेच याकाळात बुद्धीची वाढ होण्यासाठी ;प्रकृती स्वास्थ्यासाठी समतोल आहार कसा व कोणते घ्यावेत यावर त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. शेवटी आभार प्रा.सौ. निकिता ऐनलावार यांनी मांनले.
यावेळी पर्यवेक्षक प्रा.एस.एन. पाटील, प्रा.सौ.चंद्रकला तोंडारे मॅडम जवेरिया पटेल प्रा.नरेंद्र मुक्तावार ,प्रा.राजेंद्र भुसाळे व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
