देगलूर प्रतिनिधी दि.११ :- देगलूर नगरपरिषद निवडणुकीची चर्चा वेग घेत असून, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शहरात राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. आरक्षणाची घोषणा होताच अनेक इच्छुकांनी पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, या सर्वांमध्ये जनतेच्या मनातून एकच आवाज घुमू लागला आहे – “बबलू टेकाळे तुम आगे बढ़ो, जनता तुम्हारे साथ है!”
खुशी सेवाभावी संस्था आणि कृषी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्याचा वसा जपणारे एकनाथ (बबलू) टेकाळे हे देगलूरमध्ये लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक मानले जातात. जात, धर्म, पक्षीय भेदाभेद न मानता सर्व घटकांसाठी त्यांनी केलेल्या सेवा कार्यामुळे आज प्रत्येक घरातून त्यांचे नाव आपुलकीने घेतले जाते.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण घोषित झाल्यापासून बबलू टेकाळे यांच्या समर्थकांमध्ये चैतन्य संचारले आहे. शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक संघटनांनी टेकाळे यांनी येणारी निवडणूक लढवावी, अशी मागणी सुरू केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना बबलू टेकाळे यांनी सांगितले –
“जनतेचा विश्वास आणि प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. निवडणूक लढवण्याबाबतचा अंतिम निर्णय माझ्या सहकाऱ्यांशी, ज्येष्ठ नागरिकांशी आणि टेकाळे परिवाराशी चर्चा करूनच जाहीर करेन.”
समाजकारणाला प्राधान्य – जनतेशी थेट नाळ
बबलू टेकाळे यांच्या कार्याची वैशिष्ट्ये –
अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप
पूरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत
उपजिल्हा रुग्णालयात अन्नदान उपक्रम
शेतकऱ्यांकरिता कृषी साधनांची मदत
गरजू रुग्णांना औषधोपचार व रक्तदान मोहीम
बेघर, विधवा, गरीब कुटुंबांना जीवनावश्यक मदत
याच सामाजिक कार्यामुळे शहरात भावना व्यक्त होत आहे –
“सेवा हाच धर्म मानणाऱ्या बबलू टेकाळेंना नगराध्यक्षपद मिळालं तर देगलूरचा विकास वेग घेईल.”
जनतेची उमटलेली भावना
शहरातील युवक वर्ग आणि नागरिक सध्या जाहीरपणे टेकाळेंच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर पुढे येत आहेत.
जनतेच्या प्रेम, विश्वास, आणि आशीर्वादाच्या जोरावर बबलू टेकाळे लवकरच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतील, अशी शहरात चर्चा रंगत आहे.
