मी सर्वप्रथम कर्तव्याला प्राधान्य देणारा माणूस — सपोनि करीमखान पठाण

कुंडलवाडी— रुपेश साठे दि.३० :  मी सर्व प्रथम कर्तव्याला प्राधान्य देणारा माणूस शहरातील व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन तसेच शहर व परिसरात गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी मी पुर्णपणे प्रयत्न करून गुन्हेगारी व्यक्तीला पायबंद घालून अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करणार आणि शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवीन,असे
कुंडलवाडी शहरातील पोलीस ठाण्यात नव्यानेच रूजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांनी शहरातील पत्रकार बांधवांची बैठक बोलावून त्यांच्याशी संवाद साधले त्यावेळी ते असे म्हणाले की,मी सर्व प्रथम कर्तव्याला प्राधान्य देतो.सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतो. गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी मी पुर्णपणे प्रयत्न करून गुन्हेगारी व्यक्तीला पायबंद घालून अवैध धंदे बंद करण्यात येतील, कुंडलवाडी शहरातील व परिसरातील पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मी व माझे सहकारी पोलीस कर्मचारी प्रयत्नशिल राहणार असे दि.२९ ऑगस्ट रोजी पोलिस ठाणे येथे आयोजित पत्रकारांचा बैठकीत ठाण्याचे सपोनि करीमखान पठाण यांनी असे प्रतिपादन केले.
पुढे बोलताना पठाण म्हणाले की,
पत्रकार बांधव आपल्या लेखनीच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात त्याच प्रमाणे आम्हीही तेच काम करतो.पण आमची नियुक्ती शासनाने केलेली असते.पोलीस व पत्रकार यांच्यात काही कामात साम्य असते. जर एखादी व्यक्ती गुन्हा केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल जेणे करून तो पुढे चालून मोठा गुन्हा तर करणार नाही. आगामी सण-उत्सव काळात ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित नादावे यासाठी पत्रकारांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.अशी अपेक्षा व्यक्त केले.
यावेळी उपस्थित पत्रकार बांधव शहरात चालू असलेल्या अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी केली.तसेच शहरात पोलिसांची रात्रीची गस्त सुरू करावे,जुन्या पोलीस ठाण्यात दोन पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात यावे, अल्पवयीन मुले वाहन चालवतात त्यांचावर प्रतिबंध लावावे,
विनापरवाना ऑटो, ट्रक्टर चालकास प्रतिबंध घालावे, डाॅ.हेडगेवार चौकातील ऑटोस्टांड ईतर ठिकाणी हलविण्यात यावे यासह आदी मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी,पो.काॅ.गजानन अनमुलवार जेष्ट पत्रकार कल्याण गायकवाड,गणेश कत्रुरवार,मोहम्मद अफजल,सुभाष दरबस्तेवार,सिद्धार्थ कांबळे,हर्ष कुंडलवाडीकर,माजीद नांदेडकर,कुणाल पवारे,संतोष चव्हाण,राजू लापसेटवार,शेख शमशोदीन,रूपेश साठे, अशोक हक्के,दिगांबर लाडे,राजेश कोलंबरे आदींची उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *