अंबाडी घाटात भीषण अपघात
किनवट प्रतिनिधी सी एस कागणे दिनांक ३१ ऑगस्ट : दिनांक ३० ऑगस्ट रोजी किनवट हुन आदिलाबाद जात असताना दुपारी एक वाजता च्या सुमारास किनवटचे सेवानिवृत वनक्षेत्रपाल नारायण कटकमवार यांच्या कारचा अंबाडी घाटात अचानक गाडीचे टायर फुटून गाडीचे संतुलन बिघडल्याने हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात नारायण कटकमवार यांचे दोन मुले योगेश आणि महेश गंभीर जखमी झाल्याने यांना किनवट हुन खाजगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले आणि नारायण कटकमवार यांना किनवट च्या रुग्णालयात डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले ते ६४ वर्षाचे होते. त्यानंतर रीतसर शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह परिवारा सुपूर्त करण्यात आला. ही बातमी किनवट च्या पोलीस स्टेशनला कळताच पोलीस स्टेशनचे जमादार बाळासाहेब एन. पांढरे. व पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद रापटवार. यांच्याकडून रुग्णालयात जाऊन चौकशी करण्यात आली.