छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

मुंबई, दि.०३  : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) द्वारे विमानांच्या  लँडींग, टेक ऑफ तसेच उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दि. २१  ऑगस्ट ते १९  ऑक्टोबर २०२१  पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३  च्या कलम १४४  नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जारी केले आहेत. विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू तसेच लेसर प्रकाश सोडण्याचा प्रकार करुन विमान जमिनीवर उतरण्यास (लँडींग), विमानाच्या उ्डडाणात (फ्लाईट), उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडचण आणण्याची घटना लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. विमान उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, १८६०  च्या कलम १८८  नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई, एस.चैतन्य यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *