उत्कृष्ठ कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार अशा एकूण ११ जणांना बक्षिसे व सन्मान पत्र वाटप.
देगलुर प्रतिनिधी, दि.०५ : पोलीस स्टेशन देगलूर येथील वार्षिक तपासणी निमिताने जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री प्रमोदकुमार शेवाळे साहेब यांनी काल देगलुर येथील पोलिस स्टेशन ला दिनांक ४/९/२०२१ भेट दिली .पोलीस स्टेशन च्या कामकाजाचे मूल्य मापन करण्यात आले.
पोलीस स्टेशन मधील उत्कृष्ठ कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार अशा एकूण ११ जणांना बक्षिसे व सन्मान पत्र वाटप करण्यात आले.
तसेच पोलीस स्टेशन च्या कामकाजाची प्रशंसा करण्यात आली.
वार्षिक तपासणी नंतर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची शांतता समिती ची मीटिंग घेऊन आगामी गणेश उत्सवाच्या निमिताने शासनाने घालून दिलेले नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी मनोगत व्यक्त करून कोविड १९ अनुषंगाने शासनाने दिलेले नियम पाळून गणेश उत्सव साजरा करण्याबावत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी देगलुर पोलीस ठाण्याचे अधिकारी भगवान धबडगे यांनी प्रास्ताविक करून मागील कोरोना काळात आपल्या शहरातील जनतेला वाचवण्यासाठी सर्व स्थरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्या बदल सर्वांचे आभार व्यक्त केले.
त्याच बरोबर नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेठवार, उपनगराध्यक्ष मुफ्ती मुक्तारोद्दीनसाब, नगरसेवक अविनाश निलमवार, प्रशांत दासरवाड यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात गणेश उत्सव शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करण्याचे सर्व जनतेला आवाहन केले.
शांतता मीटिंग साठी मान्यवर नगरसेवक ,सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते ,व्यापारी व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुप विजया कापड उद्योगाचे प्रमुख श्री कोटगीरे व भारत फॅन्सी चे उद्योजक नईम शेठ यांनी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
पोलीस स्टेशनचे परगेवार,गडीमे मुंढे,जाकीकोरे, सुर्यवंशी मॅडम,मोरे व पोहेका दीपक जोगे, पोना.चंद्रकांत गायकवाड, डी.बी. पथक यांनी कार्यक्रम नियोजन करून यशस्वी पार पाडला पोलीस आधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी सर्वांचे कौतुक केले.