कुंडलवाडी— रुपेश साठे,दि.०६ : येथील पोलीस ठाणे अंतर्गत गेल्या काही दिवसांपूर्वी सहा बैल व एक म्हैस विविध घटनास्थळावरून चोरीस गेल्याचे एकूण सहा गुन्हे अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आले होते,या गुन्ह्याचा तपास अत्यंत शिताफीने करुन आठ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात बैल व म्हसी चोरीचे प्रमाण वाढले होते,आता पर्यंत पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या घटनास्थळावरून बैल व म्हसी चोरी झाल्याचे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता,या घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड,यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण,उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी,पोहेकॉ तैनात बेग,चव्हाण,पोलीस नाईक महेश माकुरवार,पोकॉ जाधव यांनी तपासाचे चक्र फिरवून एकूण सहा दाखल गुन्हे अत्यंत शिताफीने उघडकीस करून गुन्ह्यातील आठ आरोपींना अटक करून त्यांच्या कडून दोन बैल किंमत पन्नास हजार एक म्हैस किंमत पन्नास हजार तसेच रोख रक्कम दोन लाख सत्तावन हजार असे एकूण तीन लाख सत्तावन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षण करीमखान पठाण,उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांनी दिली आहे.