दंतुलवार सोपान मरखेलकर (मदनूर)दि.०७ : काल मदनूरमध्ये बैल पोळा (बेंदूर) सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. . कामरेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडळाच्या ३८ गावांव्यतिरिक्त अनेक मंडळांमध्ये बैल-पोळा (बेंदूर) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे हा सण साजरा केला जात आहे आणि या निमित्ताने सर्व शेतकरी सकाळी आपले बैलाला स्वच्छ पाण्याने स्नान घालतात आणि स्वच्छ केल्यानंतर ते बैलांचे भाग वेगवेगळ्या रंगांनी सजवतात .आणि सर्व शेतकरी गूळ,व हिंगाचे मिश्रण एकजीव करून पिण्याचे पाण्यात मिसळून बैलांना खायला घालतात आणि आजच्या दिवशी बैलाकडुन कोणतेही काम शेतकरी करुन घेत नाही आणि त्यांना मारत नाही कुटुंबात सर्वच आज बैलाची पूजा करतात पुन्हा संध्याकाळी सर्व शेतकरी मोठ्या आनंदाने, त्यांचे सर्व बैल. झुल-बेसिंग बांधून, घंटा बांधून मान आणि पायात घुंगरू बांधणे, हनुमान मंदिराला मंदिरात घेऊन जातात, प्रदक्षिणा घालतात, मंदिराला भेट देतात,शेतकरी महाराजांना कुटुंबाकडे घेऊन येतो, बैलांना गाय (गो माता) ला त्याला आधी गोड धोड जेवण देवुन . त्यानंतर मित्रांना आमंत्रित करतो आणि मग सगळे एकत्र जेवतात व पोळा सणाचा आनंद घेतात.
