कुंडलवाडी –रुपेश साठे,दि.०८ :
कुंडलवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्जापूर येथे दि. ५ सप्टेंबर रविवार रोजी शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे ग्रामपंचायत कार्यालय व गावक-यातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शेख सलीम खुर्शीदमियाॅ, तसेच त्यांचे सहकारी शिक्षक मरकंटे डी.आय, नवाथे व्ही.आर, श्रीमती गायकवाड आर.एस, सौ.खिसे यु.के, सौ.सोमपुरे एन.डी, शेख साजीद आदींचे शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन व फेटा बांधून सर्वांचा सत्कार यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच सिद्धार्थ पतंगे, उपसरपंच बाबा पटेल, तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी मेंढेकर, पोलीस पाटील संजय पतंगे, पत्रकार लिंगुराम पैय्यावार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशन पाटील, गावातील शिक्षण प्रेमी मिर्झापुरे सर शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी बालमित्र उपस्थित होते.