कुंडलवाडी प्रतिनिधी–रुपेश साठे, दि. १२ :
श्री गणेश उत्सव साध्यापद्धतीने साजरे करावे,कारण कोव्हिड १९ चा संसर्ग लक्षात घेता येणारे प्रत्येक सण-उत्सव साध्यापध्दतीने साजरा करावे कारण कोणतेही सण-उत्सव साजराकरण्यासाठी शासनाचे कुठलेच निर्बंध नसून निर्बंध यासाठी आहे की, दुस-या कोरोना लाटेत नागरीकांनी एकत्रीत येवून जी परिस्थितीत उदभोवली ती परिस्थितीत पुन्हा येवू नये याकरिता नागरिकांनी एकत्रित येऊ नये जर नागरिक जास्त संख्येने एकत्रित झाल्यास परत संक्रमण परिस्थिती उद्भवते आणि तिसरी लाट सुध्दा येणार आहे. याकरिता परत ती परिस्थिती नागरीकांवर सण-उत्सवाचा निमित्ताने येवू नये म्हणून शासनाने असे निर्बंध लागू केले आहेत.
कुंडलवाडी पोलिस ठाणे तर्फे गणेश उत्सव निमित्त नगर पालिका सभागृहात आयोजित केलेल्या शांतता समितीचा बैठकीत अध्यक्षीय भाषणात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी असे प्रतिपादन केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, हे होते तर प्रमुख प्रमुख पाहूने न.प.अध्यक्षा प्रतिनिधी नरेश जिठ्ठावार, उपाध्यक्ष शैलेश-याकावार, पानसरे महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश्वर उत्तरवार,सोसायटीचे चेअरमन साईनाथ उत्तरवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाॅ.विनोद माहूरे,आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना गायकवाड असे म्हणाले की,
मिरवणुकीत बरेच लोक एकत्र येतात यातून संक्रमण वाढत जातो,सद्या बिलोली,धर्माबाद तालूक्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नसून जिल्हात सध्या चार पाच पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहे.या माघचे कारण आपण माघच्या काळात एकत्रीत न येता आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेवून सन-उत्सव,जयंती, धार्मिक, सामाजिक कार्यकर्त्यानी स्वतः पुढाकार घेऊन गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी, व आपला सन साधे पनाने साजरा करावा .