कोविड लसीकरण महा आरोग्य शिबिरात २६१ नागरिकांनी घेतली कोविड लस
कुंडलवाडी प्रतिनिधी- रुपेश साठे, दि.१२ :
येथील श्री साई मंदिरात आज दि-11:११ सप्टेंबर २०२१ रोज शनिवार मा.जिल्हा अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार एकदिवसीय लसीकरण महा आरोग्य शिबिराचे आयोजन येथील विदयार्थी गणेश मंडळातर्फे करण्यात आले होते.या कोविड लसीकरण महाआरोग्य शिबिरात शहरातील एकूण २६१ नागरिकांनी कोविड लस घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेतले असून हे शिबिर सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यँत चालू होते. या शिबिरात लस घेतलेल्या नागरीकांना विद्यार्थी गणेश मंडळातर्फे श्री गणेशाचे प्रसाद म्हणून पारले बिस्कीट देण्यात आले आहे.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद माहुरे,डॉ. नारेश बोधनकार, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी,न.प.उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार,विलास दिवशीकर, नगरसेवक प्रतिनिधी संजय गोनेलवार,आरोग्य सेविका सावंत मॅडम, देवकांबळे मॅडम, श्रीकांत अमेटवर,डेटा ऑपरेटर अजित बेग,जयराज शिंदे,वाहनचालक दत्तहारी कदम यासह आदी उपस्थित होते.
कोविड लसीकरण महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद यासह आदींनी परिश्रम घेतले आहे.