हणेगाव (ता.११) दै.आनंद नगरीचे पत्रकार प्रशांत एकनाथ माळगे यांचे तारीख १४ जुन रोजी अपघातात मृत्यु झाल्याने कुटुंबाचा आधार वड कोसळला कुटुंबीय व्यक्ती मोठ्या संकटात असताना देगलूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम वद्देवार यांच्या पुढाकारातून काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा नांदेड चे नगरसेवक व देगलूर – बीलोली विधानसभा इच्छूक उमेदवार मंगेश कदम यांनी शुक्रवार (ता.१०) रोजी हणेगाव येथे माळगे कुटुंबियांच्या घरी भेट देवून कुटुंबीयांचे सांत्वन केले, व रोख दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली. व भविष्यात कांहीं शैक्षणिक अडचणी निर्माण झाल्यास नक्कीच मदत करण्याचे आश्वासन सुद्धा यावेळी मंगेश कदम यांनी दिले यावेळी पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड, देगलूर मराठी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्याम वद्देवार,भीम शक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे कुटुंबातील एकनाथ माळगे,सुरेश माळगे, सद्दाम शेख,किशोर आडेकर,मोहसीन मुजावर व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
देगलूर मराठी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्याम वद्देवार यांच्या प्रयत्नामुळे व मंगेश भाऊ कदम यांनी केलेल्या मदती साठी अनेक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.