सोपान दंतुलवार (मरखेलकर),मदनुर प्रतिनिधी दि ११ : कामरेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडळाच्या ३४ ग्रामपंचायतींच्या ३८ गावांव्यतिरिक्त, कॅम्पसमधील मंडळांच्या गाव-खेड्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे, यावर्षी देखील श्री गणेशजी चा स्थापना कार्यक्रम सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चालू होता, आणि या प्रसंगी सर्वांनी अत्यंत भक्तिभावाने पूजा-अर्चना केली. आणि पुन्हा आरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले.
या निमित्ताने अनेक गणेश मंडळातर्फे दररोज विविध भजन, कीर्तन दररोज सकाळी आणि संध्याकाळी गाव -गावात श्री गणेशाची पूजा केली जाते. आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशाप्रकारे दहा दिवस गावागावांत भरगच्च कार्यक्रम आयोजित होनार आहेत. तर दुसरीकडे अनेक भक्तांनी एका दिवसात श्री गणेशाचे विसर्जन केले आहे, त्यात प्रामुख्याने घरगुती गणेशाचा जास्त समावेश असतो अनेक भक्त दोन दिवसांसाठी कोनी तीन दिवस, अनेक लोक पाच दिवस, अनेक सात दिवस, अनेक गावांमध्ये नऊ दिवस आणि तर बाकीचे सर्व जन गावांमध्ये अकरा दिवसात हा उत्सव साजरा करतात. या प्रसंगी, प्रत्येकजण आप आपल्या परीने मोठ्या भक्तीभावाने पूजा करतात.