श्री.शारदोपासक गणेश मंडळ कुंडलवाडी येथे २२८ नागरिकांनी घेतली कोरोणाची लस.

कुंडलवाडी प्रतिनिधी—रुपेश साठे दि. १४ :
कुंडलवाडी शहरात श्री.शारदोपासक गणेश मंडळच्या वतीने  आयोजित केलेल्या कोविड (१९) लसीकरण महाशिबिरात २२८ जनांनी कोरोणाची लस घेऊन आरोग्य प्रशासनास सहकार्य केले.
लसीकरण यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग कुंडलवाडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश बोधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका सौ.एस.डी.सावंत,सौ.व्हि.जी.देवकांबळे लस टोचक म्हणून काम पाहिले.
आरोग्य सहाय्यक श्री.मुंडे सुद्धा लस पुरवठा करण्यासाठी उपस्थित होते.तसेच ऑनलाईन प्रवेशासाठी समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ.हत्ते मॅडम काम पाहिले तालुका स्तरावरून श्री.गणेश बनसोडे तालुका सिकलसेल सहाय्यक उपस्थित होते.
यावेळी श्री.शारदोपासक गणेश मंडळाचे पदाधिकारी  दिनेश दाचावार,हरिदास रामदिनवार,चिंनमय कवठाळे,प्रदिप खेळगे साईनाथ ब्यागलवार, ईश्वर खैराते,गजानन मंडगे,श्रीनिवास मंडगे मारोती जालावार,अशोक नागुलवार कुलदिप खेळगे,राजु हुंडेकर,नारायण अंबोरे,आदी सदस्य परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *