कोरोना लसीकरण अभियानात एकूण 280 नागरिकांनी घेतली कोरोना लस.
कुंडलवाडी प्रतिनिधी–रुपेश साठे दि.१४ : येथील वंजारी समाज व स्वराज्य गणेश मंडळाच्या वतीने आज दि १४ सप्टेंबर २०२१ रोज मंगळवारी वंजारगल्ली येथे एकदिवसीय महा आरोग्य लसीकरण अभियान घेण्यात आले असून या अभियानात शहरातील व गल्लीतील एकूण २८० नागरिकांनी लस घेऊन आपल्या आरोग्याची व देशाची काळजी घेतले आहेत.
याप्रसंगी सपोनि-कारीमखान पठाण,पोउपनि-विशाल सूर्यवंशी,सोसायटी चेअरमन साईनाथसेठ उत्तरावर,संतोष शिवशेट्टे, प्रा.अ.केंद्र व्यद्यकीय अधिकारी डॉ.नरेश बोधनकर, आरोग्य कर्मचारी अंगत मुंडे,आरोग्य सेविका सावंत सिस्टर,भंडारे मंगल सिस्टर,जाधव श्रेया सिस्टर,पाटील मॅडम,वाहन चालक दत्ताहरी कदम यासह आदी उपस्थित होते.
तद्नंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे पुष्पहार देऊन यथोचित स्वागत करण्यात आले.
यावेळी सपोनि पठाण यांनी मार्गदर्शन करताना सर्वप्रथम गणेश चतुर्थीचे सर्वांना शुभेच्छा दिले पुढे बोलताना असे म्हणाले की,आमच सत्कार झाले नाहीतर पण चालते,पण आरोग्य सेविकांचे सत्कार अगोदर करा, कारण कोरोना काळात सर्वात जास्त काम त्यांनी केले.पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांनी इंजेक्शन, सलाईन जवळ राहून लावले आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम केले.आणि आपल्याला सेवाच करायचे असेल तर आई वडिलांची करा,कारण या जगात आई वडिलांच्या सेवे पेक्षा दुसरे कोणतीच सेवा नाही.लस घेण्यासाठी कोणीही घाबरू नका कारण मी दोन लस घेऊन तुमच्या समोर उभा आहे.कारण शासनाने जे ही योजना राबवते आहे ते जनतेच्या हितासाठीच असते,कोरोना लस घेतल्याने आपण,आपला परिवार,आपला देश कोरोनापासून सुरक्षित राहु .माणसाचं देवावर श्रध्दा असली पाहिजे पण मनातून असली पाहिजे,कारण आज जी कोरोना परिस्थिती निर्माण झाली ते आपल्यामुळेच निर्माण झाली.प्रत्येक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने देवाने कोरोना सारखी महामारी निमार्ण केली,कारण मी आज पर्यंत कधीच मंदिर,मस्जिद, गुरुद्वारा, चर्च बंद झालेलं बगितले नाही.आपल्या वागण्यात बदल झाल्यामुळे ते देवाने अशी परिस्थिती निर्माण केली. कारण माणूस माणसापासून दूर होत चाला होता,कोरोना काळात धन,दौलत,पैसा काहीच कामात आला नसून फक्त माणूसच माणसाच्या कामात आला.म्हणूनच मी म्हणतो मित्र चारच ठेवा पणअसे ठेवा ते संकटात एकमेकांच्या कामाला आले पाहिजे.कोरोना काळात ज्यांचे मित्र होते तेच वाचले,ज्यांचे मित्र नाही ते दुनिया सोडून गेले,कारण कोरोना जरी झाले तर मित्र मित्राला हिंमत दिला तू काय काळजी करू नको परिवाराची मी आहे, आणि तू पण काय घाबरू नको कोरोनाने तुला काही होत नाही असे म्हणून हिंमत दिले.आणि गणेश मंडळांनी आरोग्य विषयी अभियान राबवून एक समाजा प्रती देशाप्रती चांगल काम करत आहेत,तसेच विसर्जनच्या दिवशी ही पोलीस प्रशासनाची गरज पडूनये शांतपणे विसर्जन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे मोलाचे मार्गदर्शन करून आवाहन केले.
यानंतर साईनाथ सेठ उत्तरावर यांनी मार्गदर्शन करतांना आजी,माजी,भावी नगर सेवकांनी जसे मतदानाच्या वेळेस नागरिकांना मतदान करण्यासाठी घरोघरी जाऊन नागरिकांन घेऊन येतात तसे आज कोरोना लस घेण्यासाठी घरोघरी जाऊन नागरिकांना घेऊन येऊन जास्तीत जास्त करून घ्यावे असे सांगितले.डॉ.नरेश बोधनकर सरानी मार्गदर्शन करतांना असे सांगितले नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोरोना लस अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनसाठी अत्यंत सुरक्षित आहे असे म्हणाले. संतोष शिवशेट्टे यांनी आपल्या मनोगतातून गणेश मंडळांनी समाज उपयोगी उपक्रम राबवून नागरिकांना सुरक्षित ठेवत आहेत,तसेच प्रशासकीय अधिकारांना बोलावून त्यांचे सन्मान करून स्तुतीपर कार्य केले असे म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सय्याराम भोरे यांनी मानले.
यावेळी रमेश करपे सर,भीम पोतनकर,गंगाप्रसाद गंगोने,संजय भास्कर, राजू माहेवार, साईनाथ भोरे,बंटी साठे,राजेश दुप्तले,शिवकुमार गंगोने,गंगाप्रसाद नव्हाथे,वडोजी भोरे,हणमंत खांडरे व समस्त वंजारी समाज व स्वराज्य गणेश मंडळ पदाधिकारी,सदस्य,सर्व वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.