मुखेड प्रतिनिधी ज्ञानेश्वर कागणे, दि.१५ : सौ पंचवटी व संभाजी गोंडाळे यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते आशीर्वाद रुपी सत्कार करण्यात आला. या बाबत सविस्तर वृत्त आहे की, राज्य मंत्री मा.संजय बनसोडे मुखेड तालुका दौऱ्यावर आले असता मुखेड राष्ट्रवादी कार्यालयात सदिच्छा भेट घेतली त्यावेळी कवयिञी लेखीका सौ.पंचवटी गोंडाळे व संभाजी गोंडाळे या दाम्पत्याने राज्यमंत्री संजय बनसोडे साहेबांना आपला प्रातिनिधिक काव्यसंग्रह भेट दिला त्यावेळी मा.बनसोडे साहेबांनी त्यातील एक कविता सर्वांसमोर वाचून दाखवली.
खरोखरच खूप आनंद वाटला आपले खूप खूप आभार बनसोडे साहेब आमच्यासाठी तो क्षण खूपच आनंदाचा होता. अशी भावना रा. काँ. पा. युवती ता.अध्यक्षा सौ पंचवटी गोंडाळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
यावेळी रा. काँ. पा.ता.अध्यक्ष शिवाजीराव जाधव साहेब महिला ता. अध्यक्ष बिराजदार ताई नांदेड जिल्हा मीडिया प्रमुख शेख शादुल भाई मादासवाड सर शिंपाळे सर अॕड भाग्यश्री कासले ताई सोनकांबळे सर बच्चेवार सर सोमवारे सर उपसरपंच होकर्णा मा. शंकर पाटील लुटे तसेच शंकर पाटील सलगरकर आदी मंडळी उपस्थित होती.