कुंडलवाडी सोबतचे ऋणानुबंध कायम राहतील – महापौर डी.नितूकिरण

 

कुंडलवाडी प्रतिनिधी–रुपेश साठे,दि.१५ :

कुंडलवाडी हे गाव माझे आजोळ असून या गावात माझे बालपण गेलेले आहे. मी लहानपणी माझे सर्व दिपावलीच्या आणि उन्हाळी सुट्ट्या येथेच येऊन खर्च करित असे पण मी आज जरी तेलंगणा राज्यातील निजामाबाद शहराची महापौर जरी झाले तरीपण यापूढे माझे आजोळ असलेल्या कुंडलवाडी शहरा सोबत कायमचे ऋणानुबंध राहतील असे प्रतिपादन तेलंगणा राज्यातील निजामाबाद शहराचे महापौर व कुंडलवाडी येथील प्रसिद्ध व्यापारी कै.व्यंकटेश उर्फ बुडमसेठ धात्रक यांच्या भाची डी.नितूकिरण  मॅडम यांनी केले. ते कुंडलवाडी येथे भक्ती गणेश मंडळ आणि कै.व्यंकटेश उर्फ बुडम सेठ परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभास उतर देताना ते सत्कार मूर्ती म्हणून बोलत होते. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी निजामाबाद महानगरपालिका चे माजी नगरसेवक तथा महापौर डी.नितूकिरण मॅडम यांचे पती डी.शेखर अण्णा तर प्रमुख पाहुणे म्हणून निजामाबाद महानगरपालिकेचे महापौर मॅडम डी.नितूकिरण सोबत आलेले नगरसेवक धर्मपूरी अण्णा,नारायण अण्णा,देवेंद्र अण्णा,कुंडलवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सुरेखा नरेश जिट्टावार,उपनगराध्यक्ष शैलेश सेठ र्याकावार,कुंडलवाडी पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक के.एस.पठाण,पोलिस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी,कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे चेअरमन साईनाथ उतरवार,कुंडलवाडी नगरपालिकेचे नगरसेवक शंकर अण्णा गोनेलवार,सौ.अनिता सायरेडी पुपलवार,व्यंकट शिरामे,पोशटी पडकुटलावार,सायरेडी पुपलवार,माजी नगराध्यक्ष भूमन्ना ठकूरवार,माजी उपनगराध्यक्ष मोहन गंगोने,डाॅ.प्रशांत सब्बनवार,एच.दतात्रय निजामाबाद,कामाजी दुड्डे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डी.नितूकिरण मॅडम म्हणाल्या की,कुंडलवाडी येथील भक्ती गणेश मंडळ आणि धात्रक परिवारांनी माझी निजामाबाद शहराच्या महापौर पदी निवड झाल्याचे औचित्य साधून माझा एवढा मोठा सन्मान आज जनमानसात करत आहेत. माझ्या आजोळी कुंडलवाडी येथे होत असलेला हा सत्कार पाहून मी भारावून गेलेली आहे.उलट मला यापुढे जास्त काम करण्याची उर्जा मिळालेली आहे. माझ्या परीने मी आमच्या निजामाबाद शहराचा भरमसाठ विकास करित आहे. म्हणून तर आमचे आमदार साहेब माझी निजामाबाद शहराच्या महापौर पदी निवड केली आहे. या निमित्ताने का होईना खूप वर्षांनी मला माझ्या आजोळी माझ्या मामाच्या घरी कै.व्यंकटेश उर्फ बुडम सेठ यांच्या घरी यायला मिळाले. येथे आल्या बरोबर मला माझ्या संपूर्ण बालपणाची ,माझ्या आजी आजोबाची माझे मामा कै.व्यंकटेश उर्फ बुडम सेठ व या पोच्चमागल्ली सहीत येथील भक्ती गणेश मंडळाची आठवण झाली. व ही आठवण माझ्या मनात कायमस्वरूपी राहिल व कुंडलवाडी सोबतचे माझे जे ऋणानुबंध आहेत ते यापूढेही असेच कायम राहणार असल्याचेही ते बोलून दाखविले. या प्रसंगी साईनाथ उतरवार,मोहन गंगोने.के.एस पठाण सर(सहाय्यक पोलीस निरिक्षक) यांची समयोचित भाषणे झाली. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भक्ती गणेश मंडळाचे पदाधिकारी राजेश कळसाईत,अशोक मदनुरवार,लिंगूराम तेलकेश्वर ,राजेश जडलावार,गणेश कांबळे,नरसिंग मदनुरवार,सूर्यकांत गुंडाळे, सहीत भक्ती गणेश मंडळाचे इतर कार्यकर्ते व धात्रक परिवारातील साईनाथ धात्रक,आनंद धात्रक यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास कुंडलवाडी शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,नगरसेवक व पत्रकार गणेश कत्रुवार,मोहम्मदअफजल,अमरनाथकांबळे,राजेश्वर कोलबंरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पत्रकार सुभाष दरबस्तेवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *