कुंडलवाडी प्रतिनिधी –रुपेश साठे,दि.१५ :
पोचम्मा गल्ली येथील विद्यार्थी गणेश मंडळाच्या वतीने श्री विठ्ठल साई मंदिर येथे शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा काल दि.१४ सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक के.एस.पठाण तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष भुमन्ना ठक्करवाड, नगरसेवक प्रतिनिधी सायरेड्डी पुप्पलवार,मुख्याध्यापक युएसराठोड,नगरसेवक प्रतिनिधी संजय गोनेलवार समाजसेवक गंगाधर कोटलावार, पत्रकार नागोराव लोलापोड,रुपेश साठे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सपोनि के.एस.पठाण,पोउपनी विशाल सूर्यवंशी, मुख्याध्यापक यु.एस.राठोड, माजी नगराध्यक्ष भूमन्ना ठककुरवार, नगरसेवक प्रतिनिधी सायरेड्डी पुप्पलवार, समाजसेवक गंगाधर कोटलावार, पत्रकार नागोराव लोलापोड, रुपेश साठे यांचा शॉल,श्रीफळ, पुष्पहार देऊन विध्यार्थी गणेश मंडळातर्फे सन्मान करण्यात आला आहे.
तद्नंतर के एस पठाण यांनी विध्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात मिलिंद विद्यालयाचे विद्यार्थी एन एम एम एस या शिष्यवृत्ती परिक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या कु.स्वरुपा प्रल्हाद शिंदे, दिपक नागेश नामावार, कु. राजश्री हणमंत कोटचिरे, नंदिनी साईनाथ बोडके, कु. नंदिनी नागनाथ श्रीखंडे, कु. वैष्णवी नरसिंग खांडरे, निकिता पिराजी, सुर्यवंशी, हरिष पोशट्टी नागुलवार, कु.निकिता दमन्ना गट्टुवार, शुभम गंगाधर मदिकुंटावार, लोकेश रमेश गंदमोड यांच्यासह अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश कोंडावार, अजय गोनेलवार, साईनाथ बुडावार, नरेश ठककुरवार, सचिन बिल्लावार, रमेश बिरमवार, वजीरे किरण,सुरेश गोनेलवार, राजेश सोमावार, धर्मेंद्र ठककुरवार, साई राहेरकर, चेतन गिरगावकर आदींनी परिश्रम घेतले आहे.या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन व आभार संतोष शिवशेट्टे यांनी केले.