देगलुर प्रतिनिधी, दि.१८ : काल दि. १७ रोजी देगलूर येथील सामाजिक वनीकरण विभागात विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत वनपाल श्री सुरेश शिंदेंच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. वनपाल श्री सुरेश शिंदेंनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज सकाळी ०७.३० वाजता नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे सामाजिक वनीकरण मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकवला. रामजी ताडखेलकर, यादव औलवार, अनिल मालगिरे, हगमंत तलारे, यमुनाबाई वाघमारे, राजाबाई रामलू कांबळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.