तळवाडे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

मालेगाव, दि. २५ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, तळवाडे या भव्य वास्तूचा उद्घाटन सोहळा राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांचे हस्ते पार पडला. यावेळी सरपंच अहिल्यादेवी जाधव, उपसरपंच प्रमोद कदम, उपमहापौर निलेश आहेर, बाजार समितीचे उपसभापती सुनिल देवरे, मनोहर बच्छाव, शशीभाऊ निकम, निलेश काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहूल पाटील, शाखा अभियंता विकास दळवी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह उभारण्यासाठी सुमारे ६५.६२ लक्ष इतका खर्च आला आहे. हे सभागृह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्यागाचे, अनिष्ट रुढी परंपरांविरोधात लढा देणारे संघर्षाचे प्रतिक असून या सामाजिक सभागृहाच्या माध्यमातून समाजाला नक्कीच प्रेरणा मिळेल. असा विश्वास मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केला. या उद्घाटन सोहळ्याला कमलाकर ततार, सिंधुबाई कदम, गौतम अहिरे, सारीका सोनवणे, बाळु पवार, ज्यांती अहिरे, अनिल शिरोळे, ज्योती पाटील, घनश्याम जगताप, वैशाली शिरोळे, शेखर पवार, छाया शिरोळे, सुचिता कुवर हे सदस्यही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *