शेती वाचवा देश वाचवा मुखेड मधे शेतकरी आंदोलनाला समीश्र प्रतिसाद.

 

मुखेड ता.प्रतिनिधी :ज्ञानेश्वर कागणे दिनांक.२७ :
मुखेड आज माकप व संयुक्त किसान मोर्च्यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.शहीदे-इ- आझम भगत सिंग यांच्या जयंती दिनी शेतकरी,शेतमजूर,युवक,विध्यार्थी यांचा एल्गार,यावेळी माकपच्या शेतमजूर युनियन,डी.वाय.एफ.आई. युवक संघटना,एस.एफ.आय. विद्यार्थी संघटना,किसान सभा या जनसंघटनाच्या उपस्थितीत व शेकाप,स्वाभिमानी शेतकरी संघटना,काँग्रेस,वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांच्या वतीने या भारत बंदला पाठिंबा देण्यात आला.या वेळी तीन कृषी काळे कायदे रद्द करा,चार कामगार श्रम संहिता रद्द करा या मुख्य मागण्यासोबतच स्थानिक मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार सरांना देण्यात आले.यावेळी शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड विनोद,सचिव कॉम्रेड अंकुश अंबुलगेकर, एसएफआयचे राज्य सचिव कॉ. बालाजी कलेटवाड, जिल्हाध्यक्ष विजय लोहबंदे, जि. सहसचिव शंकर बादावाड ,डी.वाय.एफ.आय. चे कॉ. अंकुश माचेवाड, कॉ. सुधाकर अंबुलगेकर, कॉ. आकाश देशटवाड, कॉ. लक्ष्मण गिरी, कॉ. अमीर कुरेशी, कॉ. शिवकुमार कांबळे, शेतमजूर युनियनचे कॉ. माणिक गोनशेटवाड, कॉ. रेणुका तुरेवाड, कॉ. पार्वतीताई माळी, कॉ. राजू वाघमारे, कॉ. हणमंत वाघमारे, शेकापच्या वतीने भाई ऍड.डुमने, असद भाई,भाई पांडुरंग लंगेवाड स्वाभिमानीचे शिवशंकर कलंबरकर,काँग्रेसच्या वतीने किरण जाहुरकर,वेगवेगळ्या दैनिकाचे पत्रकार बबलू मुल्ला,पवन जगडमवार यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *