शहीद जवान निलेश धांडे यांचे पार्थिवावर वरुर जऊळका येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अकोला,दि.5-  वरुर जऊळका ता. अकोट येथील रहिवासी असलेले भारतीय सीमा रस्ते संघटनमधील शहीद सैनिक निलेश प्रमोद धांडे यांचे पार्थिवावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी साश्रुनयनांनी या वीर जवानास अखेरचा निरोप दिला.

शहीद निलेश धांडे हे नागालँडच्या दिमापूर शहर सीमेजवळ सिमा रस्ते संघटनच्या ग्रिप पायलर या पदावर सन 2013 पासून कार्यरत होते. नागालँड येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.4) विशेष विमानाने नागालँड येथून नागपूर व नागपूर येथून विशेष वाहनाने मुळगावी आणण्यात आले.  त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दिड वर्षाचा मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

याप्रंसगी विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, तहसिलदार निलेश मडके, जऊळका सरपंच उषाताई काठोडे, ग्रामसेवक रेखाते, सुभेदार मेजर डी.पी. धांडे, माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.एस. पडोळे आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी  भावपूर्ण शब्दात निलेश धांडे यांना श्रद्धाजंली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *