कुंडलवाडी प्रतिनिधी–रूपेश साठे, दि०५ ; बिलोली देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना निवडून देणे म्हणजे माजी आमदार कै. रावसाहेब अंतापूरकर यांना खरी श्रद्धांजली वाहणे होय असे प्रतिपादन राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. ते कुंडलवाडी येथे देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीत महा विकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते. या प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी कुंडलवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सुरेखा जिटावार या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालक मंत्री अशोकराव चव्हाण ,नांदेड चे आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, जि.प .अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर ,माजी महापौर अब्दुल सत्तार व मनपा नगरसेवक बाबुराव गजभारे ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नागनाथ पाटील कवळीकर, संग्राम हायगले, उमेदवार जितेश अंतापूरकर सह आदी मान्यवर उपस्थित होते .पुढे बोलताना चव्हाण साहेब म्हणाले की, या मतदारसंघाचे नेतृत्व दोन वेळा कै.रावसाहेब अंतापूरकर यांनी केले.
त्यांच्यासारखा प्रामाणिक आमदार मी पाहिला नाही. सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन जाणारा एक सच्चा आमदार होता. कोरोना ने त्यांना आपल्यापासून हिरावून घेतले आहे. खरं कोरणा योद्धा हे कै. रावसाहेब अंतापुरकरच आहेत असे भावनिक उदगार काढून येत्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना आमदार करून अंतापूरकर यांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची आहे असे उपस्थित जनसमुदाय यांना आव्हान केले .
याप्रसंगी माजी आमदार वसंतराव चव्हाण,शैलेश ऱ्याकावार, नागनाथ पाटील सावळीकर, सुनील बेजगमवार,सौ. मंगाराणी अंबुलगेकर ,बाबुराव गजभारे, अब्दुल सत्तार, अमरनाथ राजूरकर ,जितेश अंतापूरकर यांची भाषणे झाली.
यावेळी नगराध्यक्षा सौ.सुरेखा नरेश जिट्ठावार,उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेश जिट्ठावार,माजी नगराध्यक्ष डॉ.एस एस शेंगुलवार,नगरसेवक शंकर आण्णा गोनेलवार,सचिन कोटलावार,मुखत्यार शेख,सुरेश कोंडावार,नगरसेविका प्रतिनिधी संजय भास्कर,पोषट्टी पडकूटलावार, व्यंकट श्रीरामे,राजेश पोतनकर,अशोक कांबळे सर,प्रदीप आंबेकर,भीम पोतनकर,शिराज पट्टेदार,यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व करकर्ते,पत्रकार बांधव,शहर व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या जाहीर सभेचे प्रास्ताविक हर्ष कुंडलवाडीकर यांनी केले तर,सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्राध्यापक गोपाळ चौधरी यांनी मानले आहे.