राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईत स्मृतीस्तंभ उभारण्यासाठी  शिष्टमंडळाने घेतली पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

मुंबई, दि. 7 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे निधन झालेल्या मुंबईतील गिरगावमधील पन्हाळा लॉज राजवाडा येथे स्मृतीस्तंभ उभारावा यासाठी मालोजीराजे शाहू छत्रपती तसेच गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांचे निधन झाले तेथे यावर्षी स्मृतीस्तंभ उभारण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. याबाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन वरळी परिसरात कोल्हापूर निवासी बांधव मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने तेथेही एक स्मारक उभारण्याचा मानस असल्याचे श्री.ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

या शिष्टमंडळात आमदार सर्वश्री चंद्रकांत जाधव, जयंत आजगावकर यांच्यासह ॲड.गुलाबराव घोरपडे, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, किरण चव्हाण, अनूप चौगुले, प्रताप नाईक, राजेश पाटील आदींचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *