कुंडलवाडी प्रतिनिधी– रुपेश साठे 07 : कुंडलवाडी येथील रहिवासी तथा पत्रकार सिध्दार्थ रमेशराव कांबळे यांची वंचित बहुजन आघाडीच्या कुंडलवाडी शहराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली असुन सदरील निवडीची बैठक दि.०७ ऑक्टोबर रोजी देगलूर येथे पार पडली.
या निवडीचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रवक्ता फारुख अहमद,जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरगंले,जिल्हाउपाध्यक्ष शंकर महाजन तालुकाध्यक्ष धम्मदिप गावंडे यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल सिध्दार्थ कांबळे यांचे सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात आले.