अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट; कृषि क्षेत्रातील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर देणार

मुंबई, दि. 07 : अर्जेंटिनाचे राजदूत ह्युगो झेवियर गोब्बी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषि मंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.

यावेळी अर्जेंटिना व महाराष्ट्रातील कृषि क्षेत्रातील पिके, हवामान, पाऊस, आर्द्रता, सेंद्रिय शेती, वाहतूक व्यवस्था, फलोत्पादन या बाबींवर दोन्ही बाजूच्या मान्यवरांनी आपापल्या भागातील माहितीची देवाणघेवाण केली. राज्यात तसेच अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचे पीक घेण्यात येते. या पिकासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

साठवण क्षमतेवर चर्चा

अर्जेंटिना देशात कमी खर्चात शास्त्रीयदृष्ट्या चांगल्या प्रकारे कृषी मालाची साठवणूक करण्याबाबत तंत्रज्ञान आहे. त्यासंदर्भात अर्जेंटिनाकडून सहकार्याची अपेक्षा कृषि मंत्री श्री.भुसे यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातून होत असलेले कांदा, केळी, द्राक्षे, डाळींचे मोठ्या प्रमाणातील उत्पादन व निर्यात याची माहिती कृषि मंत्र्यांनी अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाला दिली. हवामान बदलासंदर्भात आणखी संशोधन होण्याची गरज दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *