दंतुलवार सोपान मरखेलकर, (मदनूर) प्रतिनिधी दि.१६ : मदनूरमध्ये रावणाचे दहन केले गेले. कामरेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडळ परिसरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आर्य समाज आणि रौतवार पटेल यांच्याकडून विजयादशमीच्या दिवशी सकाळी आर्य समाज मंदिरात ध्वजारोहण आणि हवन करून आर्य समाजाचे अध्यक्ष रमेश तम्मेवार आणि सचिव सोपान दंतुलवार यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आणि कोषाध्यक्ष आरमोरवार हनमंलू यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सरपंच दर्शवार सुरेश यांचे भव्य घोड्यावरून बसुन यांना बाहेर काढले आणि शहराच्या मुख्य रस्त्यावरून भव्य रॅली काढून यलम्मा गुटा येथे पोहोचले. सर्व ग्रामस्थांकडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले, यावेळी अनेक प्रमुख पाहुण्यांनी आजच्या विजया दशमीला वाईट व्यक्तीकडून वाईट विचार जाळण्याचे विचार प्रकट केले. स्थानिक सरपंचाच्या हस्ते रावणाचे दहन करण्यात आले. त्यानंतर सर्व महिला आणि पुरुषांनी एकमेकांना सोने देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी सर्व गावकऱ्यांची उपस्थिती होती.