गोकुंदा जिल्हा परिषद गटात आरक्षणानंतर ची रणधुमाळी.

 

किनवट प्रतिनिधी सी.एस.कागणे दि.१६/१०/२०२१
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका २०२२ ची चाहूल लागताच सर्वात जास्त चर्चा आरक्षणावर होत असताना दिसत असून गोकुंदा सर्कलवर सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांचे लक्ष लागले आहे.
किनवट तालुक्यात सहा सर्कल तर बारा पंचायत समित्या अस्तित्वात आहेत सहा सर्कल पैकी गोकुंदा सर्कलवर सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख यांचे लक्ष असून जर गोकुंदा सर्कल आरक्षणामध्ये (अनुसूचित जाती) राखीव झाल्यास पक्षाच्या वतीने पक्षनिहाय निवडणुकीत भाग घेणाऱ्यांची संभाव्य उमेदवार म्हणून पक्ष प्रमुख तथा तालुका अध्यक्ष यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखविले महाराष्ट्रामध्ये भाजपा सोडून तीन पक्षाचे सरकार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार देण्याच्या तयारीत सध्या तरी दिसत आहे यामध्ये शिवसेनेकडून अतुल दर्शनवाढ, माजी सैनिक तुकाराम मशिदवार (सुभेदार मेजर), सुरेश घुम्माडवार, मारुती सुंकलवाड यांची नावे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांनी बोलून दाखविली राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशांत ठमके, अरुण आळने यांची नावे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी बोलून दाखवले भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांनी भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता हाच उमेदवार असल्याचे बोलून दाखवले काँग्रेस तालुका अध्यक्ष के सूर्यकांत रेड्डी यांनी आरक्षण जाहीर झाल्यावर उमेदवाराची घोषणा करण्यात येईल असे बोलून दाखवले बहुजन मुक्ती पार्टी चे तालुका सचिव विजय वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही आरक्षण घोषित झाल्यावर निवडणुकीत सक्रिय भाग घेणार असल्याचे बोलून दाखविले यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किसन राठोड यांच्याशी संपर्क केला असता फोन लागला नसल्याने त्यांचे मत जाणून घेता आले नाही यानंतर अपक्ष उमेदवारांचा यादीमध्ये वंचित चे माजी अध्यक्ष राजू शेळके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी स्वतः उमेदवारी घेऊन निवडणूक रिंगणात भाग घेणार असल्याचे सांगितले आहे तसेच अपक्षांच्या यादीमध्ये आनंद भालेराव यांनीसुद्धा संपर्क करून निवडणुकीत भाग घेणार असल्याचे सांगितले यामुळे तालुक्यांमध्ये गोकुंदा सर्कल अनुसूचित जाती झाल्यास निवडणुकीचे चित्र वेगळेच असणार हे मात्र निश्‍चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *