बुलडाणा, दि. १८: जिल्ह्यात १६ ऑक्टोंबर रोजी रात्रीपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली.
सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. राजेगाव परिसरातील नुकसान झालेल्या भागाची पाहणीही आज पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केली. यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. याप्रसंगी तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.