नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ईफको-टोकीयो कंपनीकडे पुर्वसुचना दाखल केलेल्या ७ लाख २२ हजार ४४३ शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे 8 नोव्हेंबर पासून त्यांच्या खात्यावर पडणार असल्याचे पिक विम्याचे आंदोलक तथा गाढे अभ्यासक बालाजी पाटील ढोसणे यांची माहिती.
मुखेड प्रतिनिधी .ज्ञानेश्वर कागणे,दि.०३ :
संपुर्ण नांदेड जिल्ह्यासह मुखेड तालुक्यात ढगफुटी अतीवृष्टीने थैमान घातले होते यामुळे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते.यामुळे शेतकर्यांत ईफको टोकीयो विमा कंपनी बाबत प्रचंड रोष होता पण ईफको टोकीयो पिकविमा कंपनीने तात्काळ तत्परता दाखवत नांदेड जिल्ह्यातील ७ लाख २२ हजार ४४३ शेतकर्यांना ४५८ कोटी ८९ लाख ७३ हजार ७११ रुपये जिल्ह्याला मंजुर झाले असुन है पैसे शेतकर्यांच्या खात्यावर टाकण्याचे काम अंतिम टप्यात असुन ते पैसे शेतकर्यांच्या खात्यावर ८ नोव्हेबर रोज सोमवार व ९ नोव्हेबंर या दोन दिवशी आँनलाईन पिकविमा भरलेल्या खात्यावर पडणार असल्याचे पिकविम्याचे गाढे अभ्यासक तथा पिक विमा बाबतीत सर्वप्रथम मुदेसुद्द असा आवाज ऊठवुन पिकविमा कंपनीला वेळोवेळी शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यास भाग पाडलेले शेतकर्यांचे नेते रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी प्रसारमाध्यमांना बोलतांना दिली.
याबाबत बोलताना सांगीतले की सर्व संघटना व शेतकर्यांत पिक विमा कंपनी बाबत प्रचंड रोष होता पण प्रशासकीय यंञणा व ईफको टोकीयोची पिकविमा कंपनी याने तात्काळ कार्यतत्परता दाखवत शेतकर्यांचे पंचनाम्याचे काम जलदगतीने पुर्ण केल्याने ही मदत लवकर मिळत असल्याने अतिवृष्टीने खचलेल्या शेतकर्यांत आनंदाचे वातावरण असुन वेळेप्रसंगी आंदोलन ऊभारुन विमा कंपनीला धारेवर धरणारे ढोसणे यांनी विमा कंपनीचे अभिनंदन केले असुन चांगल्या कामाचे नेहमी कौतुक झाले पाहीजे असे म्हणुन याकामी तात्काळ तत्परता दाखविल्याने राज्याचे कृषिचे प्रधान सचिव एकनाथजी डवले साहेबांचे,राज्याचे कृषि आयुक्त धिरजकुमार साहेबांचे,जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाँ.विपिन इटाणकर साहेब,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे साहेबासह विशेष आभार ईफको टोकीयो पिकविमा कंपनीचे मुख्य अधिकारी हेमंतजी शिंदे साहेब व जिल्हा प्रतिनिधी गौतमजी कदम साहेबांचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी आभार मानले आहेत.