देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर प्रयत्नाची पराकाष्ठा फळाला आली.

सहानुभूतीची लाट कायम.

देगलूर प्रतिनिधी दि.०३ नोव्हेंबर २०२१ :  देगलूर बिलोली विधानसभा येथील लोकप्रिय आमदार कै. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली त्यानंतर देगलूरच्या राजकारणात कमालीचे बदल घडू लागले स्थानिक इच्छुक उमेदवारांची व आयाती उमेदवाराची तोबा भाऊगर्दीच पाहायला मिळू लागली एरवी गावाचे तोंड देखील न पाहणारा व्यक्ती देखील गावाच्या विकासाचे व माझ्या गावचे गुणगान करीत वरिष्ठांच्या अवतीभवती पक्षाच्या तिकिटाच्या मागणीसाठी फिरताना दिसू लागला पण राजकारणातील बेरजेचे राजकारण व दूरदृष्टीचा विचार करून  माननीय, नामदार श्री. अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आपले  निकटवर्तीय सहकारी कै रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापुरकर याला तिकीट देण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आणि घटक पक्षाची युती असल्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे माजी आमदार श्री. सुभाष साबणे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला व उमेदवारी मिळवली आणि पंढरपुरची पुनरावृत्ती करण्याचे भाकीत केले.

दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी कडून अराजकीय वारसा असलेले सुशिक्षित डॉक्टर उत्तमराव इंगोले यांना उमेदवारी मिळाली व जनता दलाकडून देगलूर चे पत्रकार विवेक केरूरकर हे होते.  मोठ्या पक्षा मध्ये युती असल्यामुळे उमेदवार जरी कमी होते तरी पण उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अन्य उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी मिळवली असे एकूण बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती असताना देखील उमेदवार व कार्यकर्ते कामाला लागले,  पण भाजपाकडून पंढरपूरची पुनरावृत्ती चे भकीत करताच निवडणुकीला वेगळी दिशा लागली उमेदवार एकूण बारा असले तरीही सुरूवातीपासून ही लढत फक्त तिहेरी होती आणि या तिहेरी लढतीमध्ये सर्वच पक्षाने आपले वर्चस्व पणाला लावले होते याआधी कधीही आमदारकीच्या निवडणुकीला केंद्रातील मोठ्या प्रमाणात नेतेमंडळी आले नव्हते  माजीमुख्यमंत्री माजीउपमुख्यमंत्री, व केंद्रीय मंत्री असा ताफाच्या ताफाच देगलूर मध्ये पाहायला वर राहयला असे पण इतक्या नेतेमंडळी च्या भाषणातून मतदारसंघाच्या विकासासाठी सोडुन व्यतिरिक्त सर्वच काही ऐकायला मिळे काँग्रेसमध्ये उमेदवाराकडे सहानुभूती चे भांडण होते ,तर बीजेपी कडे पंढरपूरची पुनरावृत्ती चे भांडवल होते .असे असले तरी देखील ही निवडणूक दोन्ही पक्षाला तितकीच जड जात होती हे नक्कीच तरीदेखील मतदारांच्या दृष्टीने जितेश अंतापुरकर यांच्याकडे सुरुवातीपासूनच कौल होता पण प्रतिस्पर्धी च्या रणनीती मुळे व जितेश अंतापूरकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे बाजी हातातून निसटते की काय अशी भीती शेवटच्या क्षणी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटू लागली पण ऐन वेळी पालकमंत्र्यांची रणनीती व मतदार राजाची कृपा आणि सहानुभूतीच्या लाटेतुन जितेश अंतापूरकर यांना तारून नेले व विजयाची माळ खेचून आणली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *