दंतुलवार सोपान मरखेलकर (मदनूर) दि.०२ : मदनूर येथे भाजप पक्षाची भव्य विजयी रॅली काढण्यात आली. कामारेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडल येथे अवकाशीय हुजुराबाद येथील मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप पक्षाचे उमेदवार एटेला राजेंद्रजी विजयी झाले आहेत. यानिमित्ताने मदनुर येथे रथ गली ते गांधी चौक मार्गे पुराणा बस स्टॅण्ड, गात-नाच, फटाके फोडून- अतिशबाजी करून जयघोषात जय इटेला जय जय इटेला जय बीजेपी या नार्याने शहरात एकाच आवाजात कार्यकर्त्याकडून इटेला, जय भाजपचा जयघोष केला जात होता.याप्रसंगी मदनूर येथील भाजपा नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. .