नवी दिल्ली वृतसेवा दि. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. मौलाना अबुल कलाम आझाद हे पथदर्शक विचारवंत आणि प्रज्ञावंत होते. स्वातंत्र्य लढ्यातली त्यांची भूमिका प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
‘मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. पथदर्शक विचारवंत आणि प्रज्ञावंत, स्वातंत्र्य लढ्यातली त्यांची भूमिका प्रेरणादायी आहे. शिक्षण क्षेत्राप्रती त्यांना आस्था होती, समाजात बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी अथक कार्य केले.’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.