महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून मुंबईतून एकाला अटक

मुंबई दि १८ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणात मुंबई येथून अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी या व्यक्तीस अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) यांनी दिली आहे.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडूनकेलेल्या अन्वेषणातून असे निदर्शनास आलेश्री. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी नामक व्यक्तीने में. गौरी इस्पातमे तेज स्टीलमे गजानन एंटरप्रायझेसया नावेमहाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, २०१७ अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत. 

ही नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्रीव्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. श्री. अत्ताउल्हामोहम्मद नईम चौधरी यांनी विविध कंपन्यांकडून रु. १०५ कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगेकोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रू. १८.९१ कोटी इतक्या रक्कमेचा बोगस Input Tax Credit प्राप्त करून घेतला.

अत्ताउल्हा मोहम्मद नईमचौधरी यांचे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा 2017 च कलम 132 (1) (b) व (C)नुसार गुन्हा असूनकलम १३२(१) (i) नुसार कमीतकमी ६ महिनेजास्तीत जास्त ५ वर्ष तुरूंगवासआणि दंड- इतक्या शिक्षेस पात्र आहे. तसेच या कायदयाच्या कलम १३२ (५) नुसार अपराध दखलप्राप्त व अजामिनपात्र आहे.त्यामुळे अत्ताउल्हामोहम्मद नईम चौधरी यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.

अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने श्री. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र वस्तू वसेवाकर विभागाने करदात्यांस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यानुसार करभरणा व इतर बाबींची पूर्तता नियमितपणे करण्याबाबत आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *